शक्तिप्रदर्शन टाळत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शन टाळत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल


मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने अर्ज दाखल
धाराशिव प्रतिनिधी : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण व रोजगाराच्या मुद्द्यांसह निवडणूक प्रक्रियेबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तिप्रदर्शन किंवा मोठा गाजावाजा न करता पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने अर्ज दाखल करण्यात आला.
मराठवाड्यात सध्या दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागासमोर विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच पदवीधर युवकांच्या अपेक्षा हे मुद्देही चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पाटील यांनी पदवीधर मतदारसंघातील प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे. 
उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मंत्री राजेश भैय्या टोपे, माजी मंत्री फौजिया खान, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, खासदार बंधू जगन्नाथजी काळे, मोतीवाला साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, पदवीधर निवडणूक प्रमुख नरेंद्रजी काळे, प्रदेश उपाध्यक्ष हत्ती हंबीरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, जिल्हाध्यक्ष संजय काळबांडे, जगन्नाथ काळे, मुस्ताक अहमद, राजेश पवार, आशिष पवार, अतुल गावंडे, प्रा. तुषार वाघमारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदारांशी व्यापक संवाद साधण्याची भूमिका डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. पदवीधर, विद्यार्थी, युवक, शिक्षक तसेच शिक्षण व रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!