जिल्हाधिकारी धाराशिव यांची मंगरुळ येथील नवजीवन गोशाळेस भेट.

जिल्हाधिकारी धाराशिव यांची मंगरुळ येथील नवजीवन गोशाळेस भेट.

दुष्काळी परिस्थितीत कमी प्रतीच्या चाऱ्यावर योग्य प्रक्रिया करून वापर करण्याच्या सूचना*.

कळंब :-दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी मंगरूळ, ता. कळंब येथील नवजीवन गोशाळेस भेट देऊन पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गोशाळेतील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा, पाण्याची व्यवस्था तसेच पशुधनाच्या दैनंदिन व्यवस्थापनाची पाहणी करून गोशाळा व्यवस्थापनाकडून आवश्यक माहिती जाणून घेतली.

दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. 

कमी प्रतीचा अथवा उपलब्धतेनुसार निकृष्ट दर्जाचा चारा थेट जनावरांना न देता त्यावर आवश्यक प्रक्रिया करून, योग्य प्रमाणात पूरक खाद्य व खनिज मिश्रणाचा वापर करून पशुधनास देण्यात यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करून त्याचा अपव्यय टाळावा, चारा साठवणुकीची योग्य व्यवस्था करावी तसेच पशुधनासाठी आवश्यकतेनुसार संतुलित आहार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी नियमित पशुवैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचार करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

गोशाळेतील जनावरांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, गोशाळेतील स्वच्छता राखणे तसेच पशुधनाच्या आरोग्याची नियमित देखरेख करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी संबंधित गोशाळा चालक व तेथील कर्मचारी, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, धाराशिव, तहसीलदार, कळंब तालुका पशुसंवर्धन अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करून योग्य नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!