कळंब शहरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; ६ जण ताब्यात, रोख ₹२२,०७० व जुगार साहित्य जप्त

कळंब शहरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; ६ जण ताब्यात, रोख ₹२२,०७० व जुगार साहित्य जप्त

धाराशिव | प्रतिनिधी

कळंब शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत रविवारी (दि. ९ ऑगस्ट २०२६) सायंकाळी धडक छापा टाकला. पोलिस निरीक्षक एस. एस. शेख व त्यांच्या पथकाने, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईत ६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, रोख रक्कम ₹२२,०७० तसेच ‘तिरट’ नावाच्या जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कळंब शहरातील तहसीलदार बाबा दर्ग्याजवळील एका बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये, प्रशांत जाधव यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सायंकाळी सुमारे ७.०० वाजण्याच्या दरम्यान अचानक छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान तेथे अवैध जुगार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळावरून रोख ₹२२,०७० तसेच जुगारासाठी वापरले जाणारे ‘तिरट’ साहित्य जप्त केले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोकर (मॅडम), अपर पोलिस अधीक्षक श्री. सचिन पांडकर तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईमध्ये कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. एस. शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक बजबळकर, पोउपनि पठाण, पोहेकॉ/९५२ राहींज, पोना/१४६५ पोळे, पोकॉ/८३२ खाडे, पोकॉ/१८१४ अशामोड आणि पोकॉ/१८३२ माळी यांच्या पथकाने सहभाग घेतला.

अवैध धंद्यांविरोधात कळंब पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरातील जुगार अड्ड्यांवर मोठी दहशत निर्माण झाली असून, अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!