अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची बिलोली तालुका कार्यकारिणी जाहीर
बिलोली | प्रतिनिधी
समाजहित, सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या बिलोली तालुका कार्यकारिणीची नियुक्ती अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून शाल व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित, बहुजन, ओबीसी, अल्पसंख्यांक तसेच सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये बालाजी येरमलू यांची बिलोली तालुका युवा अध्यक्ष, किशन भत्ते यांची तालुका उपाध्यक्ष, मल्लिकार्जुन पाटील यांची तालुका संघटक, बालाजी देवाले यांची तालुका सचिव, बजरंग पाटील यांची तालुका कार्याध्यक्ष तर गजानन कमळेकर यांची युवा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब शेळगावकर, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष हरिदास पाटील श्रीरामे, मुखेड तालुका उपाध्यक्ष शेखा साहेब यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटन बळकटीकरण, सामाजिक एकोपा, युवकांचा सहभाग आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
