व्यसनाला ठाम नकार, उज्ज्वल भविष्यासाठी निर्धार"; आळणी कृषी महाविद्यालयात 155 विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ धाराशिव | प्रतिनिधी

 "व्यसनाला ठाम नकार, उज्ज्वल भविष्यासाठी निर्धार"; आळणी कृषी महाविद्यालयात 155 विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ

धाराशिव | प्रतिनिधी

समाजात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने धाराशिव तालुक्यातील कृषी महाविद्यालय, आळणी येथे 15 जुलै 2026 रोजी नशामुक्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास 155 विद्यार्थी आणि 4 प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती देण्यात आली. व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून स्वतःसह समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही व्यसनापासून दूर राहण्याचा आणि इतरांमध्येही जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक गीता बागवडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमान पुरके, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैला टेळे, नागेश केंद्रे आणि निलेश सरपाळे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक युवकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याची शपथ घेतली. महाविद्यालय प्रशासनानेही पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!