तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सय्यद कलीम मुसा यांचा सत्कार

तंटामुक्त अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सय्यद कलीम मुसा यांचा सत्कार

शिंगोली गावाच्या माजी सरपंचांसह मान्यवरांकडून शुभेच्छा; पुढील कार्यासाठी दिले मार्गदर्शन

शिंगोली : शिंगोली गावचे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून दैनिक त्रिशक्तीचे संपादक सय्यद कलीम मुसा यांची निवड झाल्याबद्दल हॉटेल किंग्स येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिंगोली गावचे माजी सरपंच मोहम्मद इकबाल अन्सारी, शकील शेख व असीम अन्सारी यांनी सय्यद कलीम मुसा यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून गावातील सलोखा, सामाजिक एकोपा आणि शांतता कायम राखण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सय्यद कलीम मुसा यांच्या निवडीबद्दल शिंगोली गावाचेही अभिनंदन करण्यात आले. गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून सकारात्मक आणि लोकहिताचे कार्य घडावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सय्यद कलीम मुसा यांच्या पुढील सामाजिक व तंटामुक्त गाव समितीच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!