परंड्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात संघटनात्मक विषयांवर मंथन

परंड्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात संघटनात्मक विषयांवर मंथन

आगामी काळात पक्षाचे काम अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार; कार्यकर्त्यांशी साधला संवाद

परंडा : येथे भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारिणी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब कुलकर्णी तसेच जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. धनंजय सावंत उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला.

मेळाव्यात संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि जोमाने पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यात आला. तळागाळातील कार्यकर्त्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यकर्त्यांचा उत्साह, ऊर्जा आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. पक्षाची विचारधारा आणि जनसेवेचे कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी श्री. अनिल काळे, श्री. धनंजय सावंत, श्री. गणेश खरसडे, श्री. संतोष सूर्यवंशी, श्री. दत्तात्रय मोहिते, जहीर चौधरी, श्री. उमाकांत गोरे, श्री. अरविंद रगडे तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!