शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाच्या चरणी भक्तिभाव; आनंद पाटील यांना आरतीचा मान

शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाच्या चरणी भक्तिभाव; आनंद पाटील यांना आरतीचा मान

उंडरगावच्या महादेव मंदिरात मनोभावे आरती; सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी केली प्रार्थना

उंडरगाव, ता. लोहारा : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी उंडरगाव येथील महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी आनंद पाटील यांना महादेवाची मनोभावे आरती करण्याचा पवित्र मान लाभला.

महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आनंद पाटील यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी व पूजाअर्चेसाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्रावण सोमवारच्या निमित्ताने महादेवाची भक्तिभावाने आराधना करण्याचा योग लाभल्याबद्दल आनंद पाटील यांनी समाधान व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!