‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह!’; शिराळा उपसा सिंचन योजनेचा बंद पंप लवकरच सुरू
माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा संबंधितांना फोन; लाभक्षेत्रातील गावांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
धाराशिव : शिराळा उपसा सिंचन योजनेतील बंद पडलेली पंप (मोटर) लवकरच सुरू होणार असून, त्यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मंत्री तथा आमदार विकासरत्न प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेशी फोनवरून संपर्क साधल्याने पंप सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह!’ अशी चर्चा सध्या शिराळा उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये होत आहे. योजनेतील एक पंप बंद पडल्यामुळे पाणी उपशावर परिणाम होत होता. परिणामी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून बंद पंप तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पंप लवकरच सुरू होऊन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
शिराळा उपसा सिंचन योजना ही परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, योजनेतील पंप सुरू झाल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
“जे बोलतो ते करून दाखवतो” या भूमिकेतून आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी शिराळा उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्याने आता बंद पंप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.