मुरूम पोलीस ठाण्याची धुरा नव्या जोमाने!नव्याने रुजू झालेले API गणेश पाटील यांचा दैनिक त्रिशक्तीच्या वतीने सत्कार

मुरूम पोलीस ठाण्याची धुरा नव्या जोमाने!

नव्याने रुजू झालेले API गणेश पाटील यांचा दैनिक त्रिशक्तीच्या वतीने सत्कार

मुरूम | प्रतिनिधी : मुरूम पोलीस ठाण्यात नव्याने सहायक पोलीस निरीक्षक (API) म्हणून रुजू झालेले गणेश पाटील यांचा दैनिक त्रिशक्तीच्या वतीने सदिच्छा भेटीदरम्यान सत्कार करण्यात आला.

यावेळी दैनिक त्रिशक्तीचे मुरूम शहर प्रतिनिधी इम्रान सय्यद यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी दैनिक त्रिशक्ती परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

मुरूम शहर व परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम राहावी, नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक त्रिशक्ती परिवाराच्या वतीने API गणेश पाटील यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!