आई-वडिलांच्या उत्तम आरोग्यासाठी अनवाणी पायी १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला निघालेल्या भावंडांची नितीन काळे यांनी घेतली भेट

आई-वडिलांच्या उत्तम आरोग्यासाठी अनवाणी पायी १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला निघालेल्या भावंडांची नितीन काळे यांनी घेतली भेट

रस्त्यात भेट घेत केली आस्थेने विचारपूस; पुढील पवित्र यात्रेसाठी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा

धाराशिव : आई-वडिलांच्या उत्तम आरोग्यासाठी संपूर्ण १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पायी आणि अनवाणी करण्याचा कठोर संकल्प घेऊन यात्रेला निघालेले श्री. बिपिन सिंग आणि श्री. ओम बिरसिंग या दोन भावांची रस्त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भेट घेतली.

यावेळी नितीन काळे यांनी दोन्ही भावांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या पायी-अनवाणी सुरू असलेल्या यात्रेबाबत माहिती जाणून घेतली. आई-वडिलांप्रती असलेले प्रेम, श्रद्धा आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी घेतलेला हा कठोर संकल्प निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता श्रद्धेच्या बळावर सुरू असलेल्या या पवित्र यात्रेचे कौतुक करत नितीन काळे यांनी बिपिन सिंग आणि ओम बिरसिंग यांना पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांचा हा संकल्प निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा आणि भगवान महादेव व आई तुळजाभवानीचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

आई-वडिलांसाठी घेतलेल्या या अनोख्या संकल्पातून आजच्या पिढीसमोर श्रद्धा, प्रेम आणि मातृ-पितृसेवेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!