खामसवाडीतील सिध्दीविनायक शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त कामकाजाचा आढावा.

खामसवाडीतील सिध्दीविनायक शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त कामकाजाचा आढावा; पुढील वाटचालीसाठी अधिकाऱ्यांशी संवाद
खामसवाडी : श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या खामसवाडी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शाखेस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत संस्थेच्या आगामी वाटचालीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
संस्थेच्या माध्यमातून सभासदांना अधिक चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सहकार क्षेत्रातील संस्थेची वाटचाल अधिक भक्कम करण्याबाबत यावेळी विचारविनिमय झाला. शाखेच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी श्री. बालाजी कोरे, श्री. गणेश कामटे, श्री. बलराम कुलकर्णी, श्री. अक्षय शेळके तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.
#श्रीसिध्दीविनायक #खामसवाडी #वर्धापनदिन #मल्टीस्टेट #सहकार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!