शिंगोली तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दैनिक ‘त्रिशक्ती’चे संपादक सय्यद कलीम मुसा.उपाध्यक्षपदी अभिमान शिंदे. अमोल अंकुशराव
अभिमान निवृत्ती शिंदे (पाटील) व अमोल भीमराव अंकुशराव उपाध्यक्षपदी; खंबीर नेतृत्व राहुल शिंदे व मार्गदर्शक उपसरपंच अॅड. मनोज भाऊ मगर यांच्या शुभेच्छा
शिंगोली, ता. जि. धाराशिव : शिंगोली येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दैनिक ‘त्रिशक्ती’चे संपादक सय्यद कलीम मुसा (रा. शालीमार कॉलनी, शिंगोली) यांची निवड करण्यात आली आहे. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेतील निर्णयानुसार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी ही निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायत कार्यालय, शिंगोली यांच्या अधिकृत पत्राद्वारे त्यांना निवडीबाबत कळविण्यात आले आहे.
याचबरोबर तंटामुक्त गाव समितीच्या उपाध्यक्षपदी अभिमान निवृत्ती शिंदे (पाटील) आणि अमोल भीमराव अंकुशराव यांची निवड करण्यात आली आहे. गावातील शांतता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दैनिक ‘त्रिशक्ती’चे संपादक सय्यद कलीम मुसा यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या निवडीचे ग्रामस्थांमधून स्वागत होत आहे. पत्रकारिता क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या मुसा यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या निवडीबद्दल सरपंच योगिता राहुल शिंदे, खंबीर नेतृत्व राहुल शिंदे, उपसरपंच तथा खंबीर मार्गदर्शक अॅड. मनोज भाऊ मगर, ग्रामसेवक लोमटे एस. एल. तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि समस्त शिंगोली ग्रामस्थांनी अध्यक्ष सय्यद कलीम मुसा, उपाध्यक्ष अभिमान निवृत्ती शिंदे (पाटील) व अमोल भीमराव अंकुशराव यांचे अभिनंदन केले.
खंबीर नेतृत्व राहुल शिंदे तसेच उपसरपंच व खंबीर मार्गदर्शक अॅड. मनोज भाऊ मगर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य अधिक बळकट करण्यासाठी समितीने प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.