भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी रामदास कोळगे; जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार

भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी रामदास कोळगे; जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार
धाराशिव : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेश चिटणीसपदी श्री. रामदास कोळगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची तसेच पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी रामदास कोळगे यांच्यावर आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, कार्यक्षमतेचा आणि संघटन कौशल्याचा किसान मोर्चाला निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी रामदास कोळगे यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
प्रदेश चिटणीसपदी झालेल्या निवडीबद्दल रामदास कोळगे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!