विकासासाठी आनंद पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

लोहारा-उमरग्याच्या विकासासाठी आनंद पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

प्रताप सरनाईक यांची भेट; दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची मागणी

लोहारा : लोहारा तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत आनंद पाटील यांनी पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि नागरिकांशी संबंधित विविध प्रश्न पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत संबंधित कामांना गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सध्या लोहारा व उमरगा तालुक्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थितीही गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा व उमरगा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सवलती व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आनंद पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा योजना तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या भेटीप्रसंगी महादेवजी जानकर, पंचायत समिती उपसभापती अमोलजी पाटील, कानेगावचे सरपंच नामदेवजी मामा लोभे, मार्डीचे सरपंच श्रीमंतजी पाटील, नितीन सर कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा

लोहारा-उमरगा तालुक्यातील विकासकामे तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका आनंद पाटील यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी या भेटीतून पुढे आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!