लोहारा तालुक्यातील विकासकामांसाठी विधान भवनात चर्चा
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट; प्रलंबित प्रश्न व नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा
मुंबई : विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेचे उपसभापती मा. सचिनजी अहिर साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन लोहारा तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिकांच्या महत्त्वाच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोहारा तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबी उपसभापती सचिन अहिर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. तसेच तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा आणि सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी महादेवजी जानकर, पंचायत समिती उपसभापती अमोलजी पाटील, कानेगावचे सरपंच नामदेवजी मामा लोभे, मार्डीचे सरपंच श्रीमंतजी पाटील, नितीन सर कदम आदी उपस्थित होते.