शास्त्रज्ञ, कृषी व महसूल पथकाकडूनखरीप नुकसानीची प्रत्यक्ष पाहणीआठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल;

शास्त्रज्ञ, कृषी व महसूल पथकाकडून

खरीप नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल;

 

पावसातील मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाची ठोस मदत मिळावी यासाठी नुकसानीची शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आज या पाहणी कार्यक्रमात स्वतः सहभागी होत प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे सादर होईल अशी माहिती माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

 

शनिवारी वाशी तालुक्यातील तेरखेडा परिसरातील व तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरातील शेतांमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पद्धतीने नुकसानीची पाहणी करण्यात आली. शास्त्रज्ञ, कृषी विभागातील तज्ज्ञ आणि महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पावसातील खंडाचा पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती, नुकसानीची तीव्रता आणि संभाव्य उत्पादनातील घट याची माहिती घेतली. नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे पाहणीत स्पष्ट झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषांनुसार मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळू शकते. त्यामुळे प्रशासनाकडून तयार होणाऱ्या अहवालावर आपले जातीने लक्ष आहे, तो वेळेत शासनाकडे सादर व्हावा यासाठी आपला पाठपुरावाही सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक पिकासाठी पीक कापणी प्रयोगाचे १२ प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या प्लॉटची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त पिकांची कापणी करण्यापूर्वी कृषी विभागाशी संपर्क साधून आपल्या गावातील निश्चित प्लॉटची माहिती घ्यावी.नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वेळेत शासनाकडे सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना जोवर मदत मिळत नाही, तोवर आपला सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी तेरखेडा येथेभाजपचे तालुका उपाध्यक्ष सुधीर घोलप, प्रवीण घुले, माजी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सारूक, भाजप नेते अरुण धालगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, आदेश घुले यांच्यासह शेतकरी बालाजी घुले, मंगेश कडवकर, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब घुले, उमाकांत मनगिरे, रुपेश उमरदंड आदी उपस्थित होते.

 

तर इटकळ येथे जीप सभापती सिद्धू अण्णा कोरे,पंस सभापती विक्रम देशमुख, बा.स सभापती संतोष बोबडे,वसंतराव वडगावे,अरविंद पाटील,महादेव जाधव,रमेश पाटील,मल्लिनाथ गावडे,विलास राठोड,पद्माकर जेवळे,उपस्थित होते.

 

 

पीक कापणी प्रयोग सप्टेंबरमध्येच घेण्याची मागणी

 

नुकसान झालेले पीक अधिक काळ शेतात ठेवणे शेतकरी बांधवांना शक्य नाही. अनेकांनी पीक काढण्यास सुरुवातही केली आहे. ही प्रक्रिया दिवसेंदिवस वेगात सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये नियोजित असलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या कालावधीपर्यंत अनेक शेतांमध्ये पीक उपलब्ध राहण्याची शक्यता फार कमी आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित आहेत. मात्र, त्यापूर्वीच नुकसानग्रस्त पीक काढून टाकले गेल्यास प्रयोगासाठी निश्चित केलेल्या प्लॉटवर पीक दिसून येणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनातील घट निश्चित करण्यात मोठी अडचणी निर्माण होऊन पात्र शेतकरी बांधवांवर पीक विमा अथवा शासनाच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेता पीक कापणी प्रयोग नियोजित कालावधीपूर्वीच, सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावेत, अशी मागणी आपण कृषी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी महसूल विभाग व संबंधित विमा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सप्टेंबरमध्येच पीक कापणी प्रयोग घेण्याबाबत कार्यवाही करावी असे आपण सांगितले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

या तज्ञांच्या पथकाकडून वस्तुनिष्ठ शास्त्रीय पाहणी

 

तेरखेडा येथील पाहणीत कृषी विस्तार विद्यावेत्ता, आंबेजोगाई येथील सदस्य तथा शास्त्रज्ञ डॉ.अरुण गुट्टे, आयआयटी मुंबईचे

तज्ज्ञ पथक,डॉ हेमंत बेलसरे, डॉ गोपाळ चव्हाण,असीम रामा परवीन,तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोलंगे,वाशीचे तालुका कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी,

मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासह कृषी व महसूल विभागातील अधिकारी सहभागी झाले होते.

 

तर इटकळ येथील पाहणीत ओंकार देशमुख,उपविभागीय अधिकारी, धाराशिव,अरविंद बोळंगे,तहसीलदार, तुळजापुर,श्री. आकाश राठोड, आय आय टी मुंबई  व त्यांची टीम,एस एल सुर्यवंशी,शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र तुळजापुर, के जे बचुटे तालुका कृषि अधिकारी, तुळजापुर हेमंत भिंगारदेवे, गट विकास अधिकारी, तुळजापुर, प्रा ए बी कसबे, डॉ एस एन झगडे, शास्त्रज्ञ पिक सरंक्षण, कृषि विज्ञान केंद्र, एन एस हरवाडीकर,दयानंद गळवे सहभागी होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!