येडोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादतेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकारातून ग्रामीण

येडोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकारातून ग्रामीण नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचाराचे मार्गदर्शन
येडोळा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ, नवी मुंबई यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई येथून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी केली. त्याचबरोबर आजारांचे स्वरूप, आवश्यक उपचारपद्धती, औषधोपचार तसेच पुढील वैद्यकीय काळजी याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावातच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीची सुविधा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
तपासणीदरम्यान गंभीर स्वरूपाच्या आजारांचे निदान झालेल्या रुग्णांसाठी पुढील उपचाराची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अशा रुग्णांना तेरणा हॉस्पिटल, नेरूळ, नवी मुंबई येथे पुढील उपचारासाठी निःशुल्क वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या आरोग्य शिबिराच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आजारांचे निदान होण्यास मदत झाली असून, आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरली आहे. ग्रामीण आरोग्यसेवेला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती श्री. सिद्धेश्वर कोरे, पंचायत समिती सदस्य श्री. भिवाजी इंगोले, श्री. विवेकानंद मिलगिरे, श्री. शिवाजी जाधव, बूथप्रमुख श्री. दीपक जाधव, श्री. नवनाथ जाधव, श्री. अभिषेक पाटील, श्री. सुधीर परिहार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!