शिंगोली ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा; टीबीमुक्त पंचायत राज अभियानात ‘सिल्वर’ पुरस्कार

शिंगोली ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा; टीबीमुक्त पंचायत राज अभियानात ‘सिल्वर’ पुरस्कार
शिंगोली : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘टीबीमुक्त पंचायत राज अभियान’ अंतर्गत शिंगोली ग्रामपंचायतीला सिल्वर पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील वर्षी ग्रामपंचायतीने ब्रॉन्झ पुरस्कार पटकावला होता. यंदा त्यापेक्षा पुढचे पाऊल टाकत सिल्वर पुरस्कार मिळाल्याने शिंगोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
गावाला मिळालेल्या या उल्लेखनीय यशामागे ग्रामपंचायत, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थांचे सामूहिक योगदान आहे. विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांनी टीबीमुक्तीच्या अभियानासाठी घेतलेले परिश्रम, जनजागृती आणि केलेल्या सातत्यपूर्ण कामामुळे शिंगोलीने ही गौरवास्पद कामगिरी साध्य केली आहे.
या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक नागरिकाने अभियानाला दिलेले सहकार्यही या यशासाठी तितकेच महत्त्वाचे ठरले आहे.
ब्रॉन्झनंतर सिल्वरची झेप घेतलेल्या शिंगोली ग्रामपंचायतीने आता पुढील वर्षी ‘गोल्ड’ अर्थात सुवर्ण पुरस्कार मिळविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आणखी जोमाने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. टीबीमुक्त गावाच्या दिशेने शिंगोलीने टाकलेले हे पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
— सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, शिंगोली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!