शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदासाठी दत्ता आण्णा साळुंखे यांच्या नावाची दमदार चर्चा

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदासाठी दत्ता आण्णा साळुंखे यांच्या नावाची दमदार चर्चा
भूम–परंडा–वाशी विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी निष्ठावंत नेतृत्वाची गरज
भूम–परंडा–वाशी : जिल्हा प्रमुख हे केवळ पद नसून पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे महत्त्वाचे नेतृत्व असते. पदासाठी गर्दी करणारे अनेक असतात; मात्र पक्षाच्या विचारांशी निष्ठावान राहून कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहणारे मोजकेच असतात.
भूम–परंडा–वाशी परिसरात दत्ता आण्णा साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांची आणि पक्षनिष्ठेची चर्चा होत आहे. संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न, कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची भूमिका आणि पक्षाच्या विचारांशी असलेली बांधिलकी यामुळे जिल्हा प्रमुखपदासाठी त्यांच्या नावाला वजन प्राप्त होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जिल्हा प्रमुखपदाची खरी ताकद पदात नसते, तर कर्तृत्व, संघर्ष आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासात असते. पदे येतात-जातात; मात्र निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम राहतो. त्यामुळे पक्षासाठी प्रतिकूल परिस्थितीतही मैदानात ठामपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वालाच संघटनेत महत्त्व मिळते.
“जिल्हा प्रमुख तोच, जो कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात उभा राहतो, संघटना मजबूत करतो आणि पक्षाच्या विचारांशी शेवटपर्यंत निष्ठावान राहतो,” अशी भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!