उमरगा शहरात पोलिसांचा विशेष ड्राईव्ह; २८ वाहनांवर कारवाई, २५ हजारांचा दंड
उमरगा : प्रतिनिधी मोयोदीन बागवान
उमरगा शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात उमरगा पोलिसांनी विशेष ड्राईव्ह राबविला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली API तायवाडे, API भराटे, ट्रॅफिक अंमलदार घाटे, मोरे, नळेगावकर व अनसरवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या विशेष मोहिमेदरम्यान ट्रिपल सीट वाहन चालविणे, कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, फॅन्सी नंबर प्लेट, नंबर प्लेट नसणे तसेच मोटार वाहन कायद्याचे इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एकूण २८ केसेस करून २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच ट्रिपल सीट प्रवास आणि दुचाकींच्या कर्कश आवाजाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभ्या असलेल्या फळगाड्या तसेच रिक्षाचालकांविरोधातही पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी BNS कलम २८५ अन्वये एकूण ३ खटले दाखल करण्यात आले आहेत.