मुरूम येथे ईद -ए- मिलादुन्नबी निमित्त सामाजिक बांधिलकी*

*मुरूम येथे ईद -ए-  मिलादुन्नबी निमित्त सामाजिक बांधिलकी*  

*संकल्प मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर; ७० जणांचे रक्तदान*

*मुरूम/प्रतिनिधी*:    

मुरूम शहरात ईद-ए- 
मिलादुन्नबी च्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मुरूम शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रक्तकेंद्र व मुरूम ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने बुधवारी (दि.२६) झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी तब्बल ७० जणांनी रक्तदान केले. मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरुवात झाली. शिबिरासाठी

धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शासकीय रक्तकेंद्रातील डॉ. विवेक कोळगे, डॉ. दिनेश कोरे रक्त संक्रमण अधिकारी, विठ्ठल कांबळे टेक्निकल सुपरवायझर येसो वाघमारे, शिवकुमार जगताप, माधव जोगदंड व कु. नीलाक्षी जानराव रक्तकेंद्र तंत्रज्ञ, गणेश साळुंके वैद्यकीय समाजसेवक गणेश भालेराव रुग्णवाहिका चालक तसेच रविराज गंभीरे रक्तकेंद्र परिचर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास चांदपाशा गवंडी, हसन झारेगार, शकील मुर्डी, पाशा येणेगुरे, बाबा कुरेशी, अजहर मदारसे, महमूद मुल्ला यांच्यासह सकल मुस्लिम समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!