पुसद शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत शिवसेना शिंदे गट यांची करण्याची मागणी

पुसद शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत शिवसेना शिंदे गट यांची करण्याची मागणी 



कैलास श्रावणे 
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ 



पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा ज्योतिबा फुले चौक पर्यंतचा हम रस्ता हा वरदळीचा हमरस्ति आहे.या रस्त्यावर अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ट्रॅव्हल्स, बसेसची रेलचेल पहावयास मिळते. 
छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये प्रशासनाच्या वतीने नो पार्किंगचे फलक लावण्यात आलेले आहे. या फलकाला लागूनच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी ठेवून दिग्रस, यवतमाळ, महागाव, फुलसावंगी आदी ठिकाणाचे प्रवाशांना याच ठिकाणावरून प्रवासी वाहनांमध्ये बसविल्या जाते. या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र नो पार्किंग चे फलका जवळ अवैध प्रवासी वाहने दृष्टीपथास पडत नाहीत हे नवलच नव्हे का ? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे .छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये सकाळी सात ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान नाका कामगारांची अलोट गर्दी उसळलेली असते. तसेच शाळेमध्ये ये जा करणारी लहान लहान शाळकरी मुले मुली यांचीही छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये वरदळ असते. अशा गर्दी मधून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवावरची कसरत करावी लागते. या बाबीकडे ही वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा ज्योतिबा फुले चौक पर्यंतच्या हमरस्त्यावर बसस्थानक आहे. या बसस्थानकाच्या मुख्य द्वारा समोर अवैद्य प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी, बसेस, ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या जातो. या बाबीकडे ही वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.पुसद शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हा वाहतूक उपशाखा पुसद यांना लेखी निवेदन देत वाहतूक सुरळीत करण्याबाबतची निवेदन दिले आहे. पुसद शहरांमधील वाहतूक सुरळीत न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.शिवसेना शिंदे गटाचे पुसद तालुकाप्रमुख गणेश पागिरे, विधानसभा समन्वयक संजय सिंह बयास, शहर प्रमुख संतोष धरणे, शहर संघटक अनिल तोंडारे, शहर संघटक अनिल चव्हाण पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे राजिक देशमुख, अध्यात्मिक आघाडीचे मनोज कोल्हेकर,उपशहर प्रमुख बाबुराव पाईकराव, उपशहर प्रमुख अरुण जाधव, प्रभाग प्रमुख सुभाष खुडे, प्रभाग प्रमुख अशोक नेमाडे, प्रभाग प्रमुख रामराव सोनवणे, प्रभाग प्रमुख रामसिंह ठाकूर, उपतालुकाप्रमुख शैलेश चंदेल, उप तालुका प्रमुख बाळासाहेब बेंद्रे आदींनी निवेदनावर हस्ताक्षर करून संबंधित जिल्हा वाहतूक उपशाखा पुसद यांना निवेदन दिले आहे. वाहतूक उपशाखा पुसद काय कार्यवाही करणार याकडे शिवसेना शिंदे गटाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!