मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे कळंब प्रतिनिधी :

मूकबधिर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे

कळंब प्रतिनिधी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
गत नऊ वर्षांपासून स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यावेळी विद्यालयातील मुलींनी आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या होत्या. रक्षाबंधनाच्या या आनंदोत्सवात युवक आघाडीच्या वतीने मुलींना दैनंदिन वापरातील वस्तूंचे गिफ्ट पाऊच भेट देण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व मुला-मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. सामाजिक बांधिलकी जपत युवक आघाडीच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
याप्रसंगी युवक आघाडीचे बाळासाहेब कथले, भाऊसाहेब शिंदे, पंकज कोचेटा, यश सुराणा, गोविंद खंडेलवाल, अशोक फल्ले, सुजाता कथले, पुनम शिंदे, रूपाली कोचेटा, अंकिता सुराणा, पूजा खंडेलवाल, नवनाथ पुरी, मनोज फल्ले, धर्मराज पुरी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर-कोठावळे सर आदी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!