*ढोकी येथील कृषी विभागाच्या जागेतील तात्काळ अतिक्रमण काढा*
*ग्रामसभेत एकमुखी ठराव*
*मागण्या मान्य नाही झाल्यास 2 सप्टेंबर पासून आमरण उपोषण*
शशिकांत भुतेकर
ढोकी/प्रतिनिधी.धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील गावालगत असलेल्या जिल्हा फळरोप वाटिका शेत गट नंबर 34 व 35 या ठिकाणी आदिवासी समाजाकडून अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे असा ठराव गुरुवार दि.27 रोजी ढोकी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत एक मुखी ठराव घेण्यात आला एक सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण जर नाही काढले तर 2 सप्टेंबर पासून सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यासह कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ढोकी गावाच्या उत्तर बाजूस गावालगत जिल्हा फळरोप वाटिका शेत गट नंबर 34 व 35 असून या नर्सरीमध्ये शेतकऱ्यांना 50 टक्के वर विविध जातीच्या रोपांची कलमे, मिळतात तसेच येथे शासकीय कर्मचारी तसेच रोजंदारीवर कर्मचारी काम करत आहेत याच नर्सरीत बीज गुणण केंद्राचे ऑफिस देखील आहे नर्सरीच्या बाजूला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ देखील आहे या जमिनीवर आदिवासी समाजाने अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाला पत्रव्यवहार द्वारे तसेच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांना भेटून सांगितले आहे तरी देखील प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे हे अतिक्रमण काढा म्हणून ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये मागे ठराव घेतला आहे ढोकी येथील सर्व पक्षीय व ग्रामस्थांनी अतिक्रमण काढा म्हणून बैठक मागील आठवड्यात घेतली होती तसेच गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय ते ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये घरकुल, एस आर मतदान नोंदणी, पाण्याचा प्रश्न, गावातील विविध रस्ते तसेच गावालगत असलेल्या जिल्हा फळरोप वाटिका येथील आदिवासी समाजाचे तात्काळ अतिक्रमण काढावा असा एकमुखी ग्रामसभेतून ठराव घेण्यात आला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय यांना निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की एक सप्टेंबर च्या आत हे अतिक्रमण काढावे नाहीतर 2 सप्टेंबर पासून सर्व ग्रामस्थ ढोकी बस स्थानक येथे आमरण उपोषण करून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांची राहील असे या निवेदनात म्हटले आहे या ग्रामसभेला उपसरपंच अमोल समुद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निहाल काजी, पंचायत समिती सदस्य अमर समुद्रे,पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम देशमुख, आंबेडकर कारखान्याचे संचालक आयुब पठाण, शिवसेनेचे राज्य समन्वयक आंदोलक एडवोकेट तुकाराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य परवेज काझी, संजय पवार, शिवसेना बांधकाम जिल्हाप्रमुख अरुण डोलारे, राजू हत्तीवाले