माहेर मंगळागौरी महोत्सव’ने रंगणार धाराशिव; महिलांच्या पारंपरिक खेळांना मिळणार उत्साहाची नवी झळाळी! (सय्यद कलीम मुसा )

‘माहेर मंगळागौरी महोत्सव’ने रंगणार धाराशिव; महिलांच्या पारंपरिक खेळांना मिळणार उत्साहाची नवी झळाळी!
लेडीज क्लबतर्फे मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन; विजेत्यांवर लाखोंची बक्षिसांची उधळण
धाराशिव : श्रावण महिना म्हणजे परंपरा, संस्कृती, आनंद आणि सखींच्या उत्साहाचा सुंदर संगम. याच पारंपरिक संस्कृतीचा जागर करत महिलांना एकत्र आणण्यासाठी लेडीज क्लब, धाराशिव यांच्या वतीने यंदाही ‘माहेर मंगळागौरी महोत्सव-२०२६’ अंतर्गत मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता लेडीज क्लब, धाराशिव येथे हा उत्साहपूर्ण सोहळा रंगणार आहे.
मंगळागौरीच्या निमित्ताने महिलांना एकत्र येत आपल्या पारंपरिक खेळांचा, संस्कृतीचा आणि सखींच्या सहवासातील आनंद अनुभवता यावा, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व सख्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या उत्साहाने आणि जल्लोषाने या महोत्सवाची रंगत वाढवावी, असे आवाहन लेडीज क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागींच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार रुपये आणि ५ हजार १ रुपये अशी प्रोत्साहनपर पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत.
४ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी
मंगळागौरी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अंतिम नोंदणी करावी. पारंपरिक खेळ, सखींचा उत्साह आणि संस्कृतीचा जल्लोष यामुळे ‘माहेर मंगळागौरी महोत्सव’ धाराशिवच्या सांस्कृतिक विश्वात आनंदाची नवी पर्वणी ठरणार आहे.
चला, सखींच्या उत्साहाने आणि मंगळागौरीच्या जल्लोषाने धाराशिवचा हा सोहळा अविस्मरणीय करूया! आपल्या संस्कृतीची परंपरा जपूया आणि आनंदाचे क्षण एकत्र साजरे करूया.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!