बाबुराव गुणवंतराव नाईक यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी नियुक्ती

बाबुराव गुणवंतराव नाईक यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी नियुक्ती
अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची जबाबदारी; जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार
दैनिक त्रिशक्ती | देगलूर, ता. मराठवाडा : सामाजिक बांधिलकी, जनहित आणि भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी बाबुराव गुणवंतराव नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सामाजिक समस्यांविरोधात प्रभावीपणे आवाज उठविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा. सय्यद कलीम मुसा यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब उर्फ राजू पाटील सुरनर, मराठवाडा सचिव शेषेराव सूर्यवंशी, देगलूर तालुकाध्यक्ष वंकलवार प्रभू, उपाध्यक्ष शेषिकांत पटणे, शहराध्यक्ष इस्माईल खान पठाण यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत बाबुराव गुणवंतराव नाईक यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीपत्रानुसार ३० ऑगस्ट २०२६ ते ३० ऑगस्ट २०२७ या कालावधीसाठी त्यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येयधोरणांना अनुसरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष बाबुराव नाईक यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील जनहिताचे विविध प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच भ्रष्टाचाराशी संबंधित बाबींना संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाबुराव गुणवंतराव नाईक यांच्या नियुक्तीचे सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून स्वागत करून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून मराठवाड्यात असोसिएशनचे सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!