भूम पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई; २१४ केसेस, १.६३ लाख रुपयांचा दंड

भूम पोलिसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई; २१४ केसेस, १.६३ लाख रुपयांचा दंड
भूम, दि. २७ : पोलीस ठाणे भूम हद्दीत दिनांक २७/०८/२०२६ रोजी भूम शहरातील गोलाई चौक, बसस्थानक परिसर तसेच इतर विविध ठिकाणी मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धडक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली.
सदर विशेष मोहिमेअंतर्गत मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणे भूम येथील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने कारवाई केली. वाहतूक शाखा, धाराशिव यांचे अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले होते.
या कारवाईदरम्यान मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण २१४ केसेस करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून एकूण ₹१,६३,०००/- (एक लाख त्रेसष्ट हजार रुपये) दंड आकारण्यात आला.
कारवाई करण्यात आलेले प्रमुख नियमभंग
विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने.
विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालविणे.
विना हेल्मेट दुचाकी चालविणे.
दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे.
कर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर वापरणे.
काळ्या काचा (टिंटेड ग्लास) असलेली वाहने.
सीट बेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणे.
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे.
रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई.
या कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांमध्ये मा. परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते, सपोनि गणेश खांड, पोहेकॉ १५२५ कोळी, पोलीस अंमलदार ६१७ गाढले, पोहेकॉ १५४७ कवडे, पोहेकॉ १२२३ शिंदे, पोहेकॉ १३४६ शिंदे, पोहेकॉ १२४४ वहील, पोहेकॉ ५६६ किंवडे, पोहेकॉ १२२८ डोके, पो. कॉ. ३८७ कोरे, पो. कॉ. ८९० कलाल, पो. कॉ. ११४ यादव, पो. कॉ. १६१४ जाधव, पो. कॉ. १११ वाघमारे, पो. कॉ. १०४८ नाईकवाडी यांचा समावेश होता.
सदर कारवाईदरम्यान पोलीस ठाणे भूमच्या वतीने भूम शहरातील तसेच पोलीस ठाणे भूम हद्दीतील नागरिक व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत तसेच यापुढे कोणत्याही प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!