अवैध दारूच्या अड्ड्यांवर भूम पोलिसांचा ‘मास रेड’; १० ठिकाणी एकाचवेळी छापा, रसायनासह ८७५ लिटर मुद्देमाल नष्ट

अवैध दारूच्या अड्ड्यांवर भूम पोलिसांचा ‘मास रेड’; १० ठिकाणी एकाचवेळी छापा, रसायनासह ८७५ लिटर मुद्देमाल नष्ट

भूम : भूम पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक कारवाई; १० ठिकाणी एकाचवेळी ‘मास रेड’, रसायनासह ८७५ लिटर मुद्देमाल नष्ट

आज रोजी पोलीस ठाणे भूम यांच्या वतीने भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या तसेच अवैध हातभट्टी चालवणाऱ्या घटकांवर धडक ‘मास रेड’ (विशेष मोहीम) कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आससली, दिंडोरी तसेच प्रॉपर भूम शहरातील इंदिरानगर व कल्याणनगर पारधी पिढी या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकून एकूण १० ठिकाणी रेड करून संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली आहे.

जप्त व नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील : कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी खालीलप्रमाणे अवैध गावठी हातभट्टी दारू व दारू तयार करण्याचे सडवा रसायन जप्त करून ते जागीच नष्ट केले.

गावठी हातभट्टी दारू : २७५ लिटर (प्रति लिटर ₹१००/- प्रमाणे) — एकूण किंमत ₹२७,५००/-

दारू तयार करण्याचे रसायन : ६०० लिटर (प्रति लिटर ₹८०/- प्रमाणे) — एकूण किंमत ₹४८,०००/-

अशाप्रकारे एकूण रसायनासह नष्ट करण्यात आलेला मुद्देमाल ८७५ लिटर, ज्याची एकूण किंमत ₹७५,५००/- आहे. या प्रकरणात एकूण १० आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, भूम श्री. अमोल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खंडे व पीएसआय बर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल (बॅच क्र. १५४७) कवडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल (बॅच क्र. १२३२) मुल्ला, पोलीस अंमलदार (बॅच क्र. ८९०) कलाल, पोलीस अंमलदार (बॅच क्र. ५०३) कवडे, पोलीस अंमलदार (बॅच क्र. ३८७) कोरे, पोलीस अंमलदार (बॅच क्र. १६१४) जाधव, व इतर पोलीस स्टाफ, पोलीस ठाणे भूम यांनी सहभाग घेतला.

भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे अवैध धंदे, अवैध दारू विक्री व उत्पादनावर यापुढेही सातत्याने कडक कारवाई करण्यात येणार असून, अवैध धंद्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!