धाराशिव शहरात मतदारांचा भल्या मोठ्या बॅनरमधून संताप; ‘आमचं मत आम्हाला परत द्या!’

मतदारांचा भल्या मोठ्या बॅनरमधून संताप; ‘आमचं मत आम्हाला परत द्या!’
धाराशिव : शहरात लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅनरमधून मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या बॅनरवर मोठ्या अक्षरांत ‘आमचं मत आम्हाला परत द्या..!’, तसेच ‘मतदाराला दिला धोका...’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.
बॅनरवर ‘जि कोटीचा भ्रष्टाचार’ असा उल्लेख करत त्यावर लाल रंगाने फुली मारण्यात आली आहे. तसेच ‘हा रिश्वतचा पुलाला जाणार नाही!’ असा मजकूरही ठळकपणे नमूद करण्यात आला आहे. प्रभाग क्र. ९ चे उधाण नगरसेवक असा उल्लेख करत मतदारांच्या संतापाचा आवाज या बॅनरमधून व्यक्त करण्यात आला आहे.
या भल्या मोठ्या बॅनरची शहरात चर्चा रंगली असून, मतदारांनी थेट बॅनरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘आमचं मत आम्हाला परत द्या..!’ या एका वाक्यानेच मतदारांच्या मनातील खदखद थेट समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!