भूममध्ये पैगंबर जयंतीचा सामाजिक एकतेचा संदेश; जुलूस कमिटीचा झेंडे न लावण्याचा ऐतिहासिक निर्णय

भूममध्ये पैगंबर जयंतीचा सामाजिक एकतेचा संदेश; जुलूस कमिटीचा झेंडे न लावण्याचा ऐतिहासिक निर्णय

शहरात हजरत महंमद पैगंबर यांची जयंती बुधवार (दि. 26 ऑगस्ट) उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती. मिरवणुक शांततेत पार पडली. जुलूस कमेटी भूम शहर च्या वतीने सामाजिक सालोखा राखत गोलाई चौक परिसरात व शहरात झेंडे लावणार नाहीत असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामध्ये भूम शहरात झेंडा लावण्यावरून सर्व जाती धर्माच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला होता. मुस्लिम समाजाने हिंदू मुस्लिम एकतेचा आलमप्रभू नगरीमध्ये दिलेल्या सामाजिक संदेशाचा सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरातील विविध भागात ठिकठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना खाऊ व शरबतचे वाटप करण्यात आले.

मिरवणुकीच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक मोहिते सर यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. हजरत मुहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेला शांतीचा संदेश म्हणजेच आपल्या आई वडिलांशी चांगले वागा. तरच तुमची मुल तुमच्याशी चांगले वागतील. पिडीत व्यक्तीला मदत करताना तो व्यक्ति मुस्लिम असो किंवा नसो याचा विचार करू नका. आपसात समझोता घडवून आणा, आपल्या शेजाऱ्यांना त्यांचा आधिकार द्या. जातीपातीच्या पुढे जाऊन त्याला उपाशी झोपु देऊ नका. मुहंम्मद पैगंबर यांची संकल्पना उराशी बाळगून हजारो मुस्लिम बांधव आज मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

पैगंबर जयंतीनिमित्त भूम शहरातील मेहंतीशावली दर्गाह येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मिरवणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष शाकीर शेख, वस्ताद आखतर जमादार, वस्ताद मामु जमादार, तौफिक कुरेशी माजी उपनगरअध्यक्ष, बबलु बागवान, आसिफ जमादार, नदीम कुरेशी, आज्जु जमादार, राजु कुरेशी, मोईन शेख, फिरोज फकीर, यजाज काझी, आमर जमादार, अमन बागवान, एजाज फकीर, पैलवान चांद सय्यद, बाबा मोमीन, मुश्ताक कुरेशी, जुबेर चाऊस, सुलेमान पठाण, आदील चाऊस यांनी परिश्रम घेतले होते.
मिरवणुकी दरम्यान मुजावर गल्ली, गराडा गल्ली, विकासरत्न संजय नाना गाढवे यांच्या वतीने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या बालकांना, शरबत, फळ, बिस्किट वाटप करण्यात आले. तसेच मराठा समाजाचे एड. विलास पवार, विठ्ठल बाराते यांनी गोलाई चौक यांच्यावतीने पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

तसेच यावेळेस भूम शहर जुलुस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 41 बहाद्दरांनी रक्तदान केले. शेवटी मेहंतीशावली दर्गाह येथे अन्नदान व शेरनी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!