शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; धाराशिव नगरपालिकेच्या नगरसेवकांसह सहकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार ओमदादा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव नगरपालिकेचे नगरसेवक श्री. प्रदीप मुंडे, श्री. संतोष उर्फ नाना घाडगे, सौ. सोनाली अमित उंबरे, सौ. केसरबाई ज्ञानदेव करवर तसेच श्री. अमित उंबरे व श्री. ज्ञानदेव करवर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या सर्वांचा शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश संपन्न झाला. यावेळी सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
जनसेवा, विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहण्याचा शिवसेनेचा विचार पुढे नेत धाराशिव शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या सहकाऱ्यांच्या सहभागाचा निश्चितच मोठा हातभार लागेल.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
यावेळी श्री सूरज साळुंके, श्री सोमनाथ गुरव, श्री ऋषिकेश मगर, श्री सह्यादी राजेनिंबाळकर, विश्वजीत गुरव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!