बिलोलीत ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त भव्य फळवाटप
नांदेड प्रतिनिधी - वैभव घाटे
इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या जन्मोत्सवाच्या (यौमे पैदाइश) पवित्र निमित्ताने बिलोली शहरात 'ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटी व सकल मुस्लिम समाज, बिलोली' यांच्या वतीने जुना बसस्थानक परिसर येथे अत्यंत उत्साहात भव्य फळवाटपाचा कार्यक्रम पार पडला. या पवित्र प्रसंगी सर्वधर्मीय नागरिकांना फळांचे वाटप करून शहरात आपुलकी, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मौलाना मुबिन सहाब ,काँग्रेसचे ॲड. भरत पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, राष्ट्रवादीचे इंद्रजित तुडमे, राजु पाटील शिंपाळकर, माजी नगरसेवक फैजोदीन कुरेशी, अब्दुल रशिद, शेख वाजिद, देवराव बाबळीकर, राजकुमार गादगे, शेख पाशा भाई,बालाजी हरणे आणि शेख नवाब आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक व विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद रियाज, शेख जावेद, साजिद कुरेशी, एकबाल इनामदार,मुश्किल काझी शेख सैलानी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शेख इम्रान, शेख रेहान, सय्यद निसार, शेख अहेमद, गुड्डू पटेल, शेख सलमान, शेख बाबा यांच्यासह शहरातील नागरिक व समाजबांधव, पत्रकार ,उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे संपूर्ण बिलोली शहरात सलोख्याचे, आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा
ईद-ए-मिलाद-उन-नबी सोबतच दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत काँग्रेसचे ॲड. भरत पवार यांच्या वतीने शहरातील मूकबधीर विद्यालय, अपंग विद्यालय, मतिमंद विद्यालय तसेच सुलतानपूर येथील 'दारुल उलुम' येथे जाऊन लहान मुलांना विशेष रूपाने फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला.