"सच्चा निष्ठावान, सर्वसामान्यांचा जिल्हाध्यक्ष; दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वावर जिल्हाभरातून विश्वासाची मोहोर"
धाराशिव | सय्यद कलीम मुसा
राजकारणात पद मिळवणे सोपे असते; मात्र सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणे हीच खरी नेतृत्वाची कसोटी असते. धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावाने, सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धतीने आणि कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाशी जपलेल्या नात्यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज जिल्हाभरात "सच्चा निष्ठावान जिल्हाध्यक्ष, यशस्वी जिल्हाध्यक्ष" अशी त्यांची ओळख अधिक दृढ होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गोरगरीब असो किंवा श्रीमंत, शेतकरी असो किंवा व्यापारी, तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक, तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो—अडचणीच्या वेळी एक फोन आला की शक्य त्या मर्यादेत मदतीसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत, प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची प्रतिमा अधिक बळकट होत आहे.
राजकारणात टीका-टिप्पणी होत असते; मात्र व्यक्तीच्या कामाचा आणि योगदानाचा विचार न करता केवळ आरोप करण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे मत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. "दुसऱ्यावर बोट उचलण्यापूर्वी स्वतःच्या कार्याचा आढावा घ्यावा," अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, विकासाभिमुख नेतृत्वावर विनाकारण टीका करणाऱ्यांना जनतेच योग्य उत्तर देईल, असा विश्वासही ते व्यक्त करीत आहेत.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी संघटन बळकट करण्यासोबतच कार्यकर्त्यांना न्याय देणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्त्यांशी थेट संवाद, लोकांच्या अडचणी जाणून घेण्याची भूमिका आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदतीचा हात देण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याविषयी जनतेत आत्मीयता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाची चर्चा सध्या जिल्हाभरात होत असून, "सर्वसामान्यांचा जिल्हाध्यक्ष" ही ओळख अधिकाधिक दृढ होत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. नेतृत्वाचे मूल्यमापन हे अफवा किंवा आरोपांवर नव्हे, तर प्रत्यक्ष काम आणि जनतेच्या विश्वासावर होत असते. धाराशिव जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या मते, दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कार्यशैलीमुळे हा विश्वास अधिक मजबूत झाला असून, भविष्यातही सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर पुढे जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आशेने पाहिले जात आहे.