कोट्यवधींच्या आलिशान बंगल्यावर ANTF ची धडक; तब्बल ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा, १३३ ग्रॅम चरससह ६९.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोट्यवधींच्या आलिशान बंगल्यावर ANTF ची धडक; तब्बल ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा, १३३ ग्रॅम चरससह ६९.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव | प्रतिनिधी

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी अवैधरित्या गांजा व चरस विक्रीसाठी बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल ₹६९,११,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर विभाग यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी ७.२० वाजता इसम नामे बाप्पा शंकर पवार, रा. तेरणानगर, ढोकी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान घरामध्ये ठेवलेल्या गोण्यांमधून ५० किलो ३५८ ग्रॅम गांजा व १३३ ग्रॅम चरस, तसेच अंगझडतीत २२ तोळे सोन्यासह एकूण ₹६९,११,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपीचा दुमजली कोट्यवधी रुपयांचा आलिशान बंगला असल्याचेही निदर्शनास आले.

घराची तपासणी करताना गांजा व चरस व्यतिरिक्त दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये पत्त्यांचा क्लब चालविला जात असल्याचे दिसून आले. तेथून मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.

या प्रकरणी पोलीस ठाणे ढोकी, जि. धाराशिव येथे बाप्पा शंकर पवार याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा व चरस कोठून आणण्यात आला आणि त्याची विक्री कोणाला केली जात होती, याचा पुढील तपास ANTF कडून सुरू आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह मंडम, पोलीस उपमहानिरीक्षक श्री. प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक श्री. अजित टिके, DYSP श्री. साईनाथ बंगेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर ठाकूर , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार शैलेश टेळे, सुरेश राठोड, पोलीस अंमलदार गणेश केंद्रे, निलेश सरपाळे, पोलीस हवालदार कैलास गाडेकर, नितीन जाधव, रवींद्र साबळे, पोलीस अंमलदार राहुल काळे, अतुल तुपे, हरीश मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्योती कीर्तीकर, प्रियंका पवार व आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!