अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाची तालुक्यात चर्चा

अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाची तालुक्यात चर्चा

तुळजापूर : शिवसेना मा. तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढदिवसाचा अनाठायी खर्च न करता समाजोपयोगी उपक्रमातून आनंद साजरा करण्याचा संकल्प अमोल जाधव यांनी केला.

उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रुग्णालयात जन्मलेल्या सर्व नवजात बाळांसाठी बेबी किटचे वाटप करण्यात आले. तसेच बाळांच्या मातांना म्हणजेच आपल्या भगिनींना भावाकडून साडीची भेट देण्यात आली. या उपक्रमातून नवजात बाळांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्यामुळे अमोल जाधव यांच्या या सामाजिक उपक्रमाची तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा आणि सत्काराचा कार्यक्रम न ठेवता समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ‘सेवा हाच खरा उत्सव’ हा संदेश अधोरेखित झाला आहे.

या कार्यक्रमास बबलू कदम, किरण कदम, गोविंद लोंढे, दुर्गादास कदम, अमोल लोंढे, मारूती गवते, शहाजी हाके, अंकुश पाटील, गौरव साळुंखे, पांडुरंग शिंदे, लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण पाटील, संभाजी नेपते, दादा लोंढे, रमेश चिवचिवे, पृथ्वीराज मलबा, गितेश जेवळीकर, स्वप्निल सुरवसे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक कार्याला नवी दिशा मिळावी आणि भविष्यातही अशाच प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबविले जावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!