चर्चा कितीही रंगवा… भाजपचा रथ थांबणार नाही! धाराशिवमध्ये वाढत्या ताकदीची विरोधकांना धास्ती?

चर्चा कितीही रंगवा… भाजपचा रथ थांबणार नाही! धाराशिवमध्ये वाढत्या ताकदीची विरोधकांना धास्ती?

धाराशिवच्या राजकारणात आज दिवसभर रंगवण्यात येत असलेल्या चर्चांना भाजपच्या वाढत्या राजकीय प्रभावानेच खरं उत्तर दिलं आहे. कोण कुठे गेलं, कोणाचा रूट कुठे बदलला, यापेक्षा भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नगरसेवकांची नावे चर्चेत का आली? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.

भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनेच विरोधकांच्या गोटात एवढी अस्वस्थता निर्माण झाली असेल, तर धाराशिवमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद नेमकी किती वाढली आहे, याचा अंदाज यावरूनच येतो.

पक्षप्रवेश झाला किंवा ऐनवेळी निर्णय बदलला, हा संबंधितांचा वैयक्तिक राजकीय विषय आहे. मात्र, त्याला ‘घोडेबाजार’, ‘कोट्यवधींचे गणित’ अशा शब्दांची फोडणी देऊन भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला पुराव्यांसह उत्तर देण्याची जबाबदारी आरोप करणाऱ्यांचीच आहे.

आरोप करा, पण पुरावेही द्या!

राजकारणात चर्चा होतात, समीकरणे बदलतात, निर्णय बदलतात; मात्र गंभीर आर्थिक आरोप करताना ठोस पुरावे असणे आवश्यक आहे. केवळ राजकीय कट्ट्यांवरील चर्चेच्या आधारावर कोट्यवधींच्या व्यवहाराचे आरोप करणे ही पत्रकारिता नव्हे, तर राजकीय अफवांना खतपाणी घालण्यासारखे आहे.

भाजपला बदनाम करण्यासाठी कितीही राजकीय आख्यायिका रचल्या, तरी जनतेसमोर पक्षाची वाढती ताकद आणि कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह लपवता येणार नाही.

भाजपचा रथ कुठल्याही इंदापूरच्या वळणावर थांबणारा नाही!

आज पाच नगरसेवकांच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्या कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात असेल, हे काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे—धाराशिवमध्ये भाजपचा विस्तार थांबवण्यासाठी आता विरोधकांना केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर अवलंबून राहावे लागत आहे, हीच भाजपच्या वाढत्या प्रभावाची खरी साक्ष आहे.

जनतेला घोडेबाजाराच्या कथा नकोत; जनतेला विकास हवा आहे.
जनतेला राजकीय अफवा नकोत; जनतेला ठोस काम हवे आहे.
आणि भाजप कार्यकर्त्यांचे उत्तरही स्पष्ट आहे—

“चर्चांनी राजकारण तापेल… पण जनतेचा विश्वास कामातूनच जिंकला जाईल. भाजपचा प्रवास सुरू आहे आणि तो थांबणार नाही!”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!