नळदुर्ग येथे जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा.. तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या

नळदुर्ग येथे जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा..
  तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफरांचा सत्कार व कॅमेरा पूजन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद..
लोहगाव : प्रतिनिधी /महेबुब शेख 

19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने नळदुर्ग येथे छायाचित्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेश पूजन व कॅमेरा पूजन करण्यात आले. त्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते उपस्थित छायाचित्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सिद्धाराम खजुरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन राठोड, उपस्थित होते. तसेच फोटोग्राफर असोसिएशनचे कोअर कमिटी सदस्य धनराज साखरे, महेबुब शेख, संजय कुंभार, अनिल जाधव आणि रियासत शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तुळजापूर तालुका ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष निजाम शेख, सचिव गणेश जवळगे यांच्यासह नितीन गायकवाड, संतोष व्हटकर, अलीम शेख, शुभंक मायाचारी, शिवानंद नाटेकरी, किरण कांबळे, किरण कानडे, सुनील दीक्षित, श्रीकांत लोहार, विकी धुते, श्रीनाथ आंगुले, प्रणव खुने, गुरुनाथ कोळी, रोहित राठोड, बबलू बिराजदार, भैय्या मोरे, मारुती कोळी, अक्षय पाटील, विशू बोंगरगे, महादेव सुरवसे, रमेश दबडे, लखन वाघमारे, किशोर दबडे व प्रतीक खुने यांच्यासह तालुक्यातील अनेक फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार व्यक्त  निजाम शेख  यांनी केले.
------------------------------------------
छायाचित्र म्हणजे केवळ एक प्रतिमा नसून, एखाद्या क्षणाची कायमस्वरूपी आठवण असते. बदलत्या काळातही आपल्या कॅमेऱ्यातून समाजातील विविध घटना, संस्कृती, परंपरा आणि भावविश्व टिपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य छायाचित्रकार करत आहेत. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!