कळंबमध्ये उबाठाला मोठा धक्का; ९ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसच्या एका नगरसेवकाचाही भाजपमध्ये प्रवेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास
कळंब : कळंब नगरपालिकेच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ होणार असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तब्बल ९ नगरसेवकांसह काँग्रेसच्या १ नगरसेवकाचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे कळंबच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून, उबाठा गटाच्या नगरपालिकेतील ताकदीला मोठी खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि धाराशिव जिल्ह्यातील युवा नेतृत्व मल्हारदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कळंब नगरपालिकेच्या राजकारणात भाजपची ताकद वाढणार असून आगामी राजकीय समीकरणांवरही या प्रवेशाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांनी उबाठाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केल्याने कळंबच्या राजकारणात भाजपचा वरचष्मा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युवा नेतृत्व मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
#कळंब #भाजप #पक्षप्रवेश #उबाठा #काँग्रेस #मल्हारपाटील #राणाजगजितसिंहपाटील