मोर्चामध्ये सहभागी झालेल्या बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था; नगरसेवक विलास लोंढे व मित्रपरिवाराचा सेवाभावी उपक्रम
धाराशिव : अनुसूचित जाती उपवर्गीकरण समर्थन मोर्चासाठी धाराशिव येथे आलेल्या बांधवांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात नाश्त्याची व्यवस्था करून नगरसेवक विलास लोंढे व त्यांच्या सहकारी मित्रपरिवाराने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
मोर्चासाठी दूरवरून आलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी नाश्ता व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी नगरसेवक विलास लोंढे यांच्यासह सहकारी मित्रपरिवाराने स्वतः उपस्थित राहून सेवाभावाने बांधवांना नाश्ता दिला.