भाजपमध्ये प्रवेशानंतर अर्चनाताई पाटील यांची नगरसेवकांशी थेट संवाद साधत विकासाचा निर्धार
कळंब : कळंब नगरपरिषदेतील १० नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी सर्व नगरसेवकांची भेट घेत थेट संवाद साधला. नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांचे स्वागत करत अर्चनाताई पाटील यांनी कळंबच्या विकासासाठी एकजुटीने आणि ताकदीने काम करण्याची भूमिका स्पष्ट केली. विकासाभिमुख नेतृत्व, जनतेशी असलेली बांधिलकी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नगरसेवकांचा स्थानिक पातळीवरील अनुभव आणि जनसंपर्काचा उपयोग कळंबच्या सर्वांगीण विकासासाठी करून घेतला जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. भाजपच्या संघटनात्मक वाटचालीत नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळणार असून, आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कळंबच्या विकासासाठी एकजूट, जनसेवेसाठी कटिबद्धता आणि भाजपच्या नेतृत्वावर ठाम विश्वास!