घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची ग्रामसभा; शिंगोलीत उद्या महिलांची १० तर ग्रामसभा ११ वाजता.

घरकुल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची ग्रामसभा; शिंगोलीत उद्या महिलांची १० तर ग्रामसभा ११ वाजता
शिंगोली : ग्रामपंचायत शिंगोलीच्या वतीने उद्या शालिमार येथे सकाळी १० वाजता महिला ग्रामसभा, तर ११ वाजता सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामसभेत घरकुल योजनेतील लाभार्थी तसेच नवीन नावे घरकुल योजनेत समाविष्ट करू इच्छिणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
ज्या नागरिकांची नावे घरकुल योजनेत आली आहेत, तसेच ज्यांना घरकुलासाठी नवीन नावाची नोंद करावयाची आहे, अशा सर्वांनी ग्रामसभेला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच व ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत शिंगोली यांनी केले आहे. ग्रामसभेला गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आवश्यक माहिती व योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!