नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा. नायगांव (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील नायगांव येथील श्री नरसोबा
0
August 28, 2026
नायगांव येथे श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा. नायगांव (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील नायगांव येथील श्री नरसोबा मंदीरात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परशुराम सेवा मंडळ नायगांवच्यावतीने नुकताच श्रावणी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, यावर्षी सर्व बृह्मवृदांनी एकत्रित येऊन आपले जुने जानवे काढून विधीवत पुजा अर्चना होम पुजा करुन नविन जानवे घातले, यावेळी नरसोबा मंदीरात अभिषेक करण्यात आला, याप्रसंगी पुरोहित अनिरुद्ध कुलकर्णी चिंचोली तसेच गजानन कुलकर्णी, विकास वाघ (कुलकर्णी), अमोल कुलकर्णी, अशोक कुलकर्णी,बालाजी गिलवरकर, विनायक वाघ,दत्तात्रय कुलकर्णी,उमेश जोशी, अमोल जोशी, श्रीनिवास कद्रे, भारत गिलवरकर,सौरभ कुलकर्णी, गणेश जोशी, वेदांत वाघ अविनाश गिलवरकर,संजय वाघ,हनुमंत गिलवरकर, गिरीश जोशी, सतीश कद्रे, गोविंद कुलकर्णी, नारायण गिलवरकर,रविंद्र वाघ, बाळासाहेब जोशी, दासोपंत जोशी,अरुण कद्रे, आदी सर्व बृह्मवृंद, परशुराम सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.