ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त रुग्ण, मतिमंद विद्यार्थ्यांना फळवाटप
सरकार ग्रुप व डंका हॉटेलचा सामाजिक उपक्रम; माणुसकीचा संदेश
कळंब : ईद-ए-मिलादुन्नबीचे औचित्य साधून सरकार ग्रुप व डंका हॉटेल यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून माणुसकी, प्रेम व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
रुग्णालयातील रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनाही फळे देण्यात आली. सणाच्या आनंदात गरजू घटकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कलीम दादा शेख, सरकार ग्रुपचे आधारस्तंभ नादर भाई शेख, दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान भाई मुल्ला, कळंब नगरपरिषद नगरसेवक अमर बाबू चाऊस, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आफताब भाई तांबोळी, आलिम दारुवाले, मोहसीन सय्यद, हुसेन शेख, उमर शेख, वसीम शिकलकर, मुन्ना खुरेशी, आजीम शेख, अमित जाधवर, सनी कांबळे, तबरेज हन्नोरे, समीर अण्णा बागवान, आमीन सय्यद, मोईन मणियार, अमन मणियार, जुबेर शेख, जनक मामा कदम यांच्यासह सरकार ग्रुपचे सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, सेविका तसेच मतिमंद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.