संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश; मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन

संजय निंबाळकर, रामेश्वर शेटे यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश; मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन

शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी

धाराशिव : ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. तानाजी जाधवर यांनी याबाबत माहिती दिली.

निंबाळकर आणि शेटे यांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केल्याने या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मातोश्रीवर झालेल्या या जाहीर प्रवेशावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या शक्तिप्रदर्शनामुळे धाराशिवच्या राजकारणात ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटे यांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!