ग्रामीण भागातील १४ विद्यार्थ्यांची विश्वविक्रमी भरारी; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद
उमरगा :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला जागतिक व्यासपीठ मिळवून देणारी अभिमानास्पद कामगिरी उमरगा परिसरातील १४ विद्यार्थ्यांनी केली आहे. World Karate Masters Association (WKMA) यांच्या वतीने चेन्नई, तमिळनाडू येथे आयोजित 3rd WKMA Guinness World Record या ऐतिहासिक उपक्रमात या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जागतिक विक्रमाच्या उपक्रमात आपला सहभाग यशस्वीपणे नोंदविला.
चेन्नई येथे आयोजित “Most People Performing Karate Chop Routine Simultaneously” अर्थात एकाच वेळी सर्वाधिक खेळाडूंनी कराटे चॉप रूटीन सादर करणे या जागतिक विक्रमाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने कराटेपटूंनी सहभाग घेतला. या उपक्रमात उमरगा परिसरातील विद्यार्थ्यांनीही आत्मविश्वासाने सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याची उल्लेखनीय छाप उमटवली.
या यशामागे विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावासोबतच पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रोत्साहन आणि सहकार्य यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक उपक्रमासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पालकांनी उत्साहाने उपस्थित राहून त्यांचा आत्मविश्वास वाढविला.
या प्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना चौधरी, डॉ. ज्योती सुरवसे, मोहन मुळे, विजयकुमार कुंभार, सुदर्शन काळे, सुबोध कांबळे तसेच पत्रकार लक्ष्मण पवार यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, या ऐतिहासिक क्षणाचे ते साक्षीदार ठरले.
🥋 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी खेळाडू
१. हर्षदा धनराज सूर्यवंशी — WR-02436
२. अवनी अतुल जाधव — WR-02437
३. तमन्ना आरिफ सय्यद — WR-02438
४. स्वर्चंद्रा विशाल सूर्यवंशी — WR-02439
५. अनुज विक्रम सूर्यवंशी — WR-02440
६. सम्यक विष्णू कांबळे — WR-02441
७. अयांश सुबोध कांबळे — WR-02442
८. शिवराज मोहन मुळे — WR-02443
९. शिवदर्शन त्रिमूर्ती शिंदे — WR-02444
१०. अयान महमदरफी शेख — WR-02445
११. तेजस ज्ञानेश्वर काजळे — WR-02446
१२. राजनंदिनी — WR-02472
१३. शर्विल ज्योती सुरवसे — WR-03008
१४. हर्ष विजयकुमार कुंभार — WR-03191
या संपूर्ण उपक्रमासाठी अमन स्पोर्ट्स क्लब, उमरग्याचे संस्थापक अध्यक्ष महंमदरफी शेख यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव, शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक स्तरावरील या प्रतिष्ठित उपक्रमात सहभाग घेतला.
या यशामुळे उमरगा परिसरातील क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या कामगिरीमुळे परिसरातील युवा खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालक, प्रशिक्षक, शिक्षक, शाळा, क्रीडाप्रेमी आणि उमरगा परिसरातील नागरिकांकडून सर्व १४ विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.