शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून आषाढी एकादशीनिमित्त दहा हजार वारकऱ्यांना फराळ
कळंब : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपूरकडे विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांची शिवसेना कळंब तालुक्याच्या वतीने उत्साहात सेवा करण्यात आली. शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून कळंब बस स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या सेवा केंद्रावर वारकऱ्यांना फराळ व फळांचे मोफत वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचा सुमारे दहा हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.
वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची भावना जपत शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. सकाळपासूनच बस स्थानक परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी होत होती. स्वयंसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने फराळ व केळीचे वाटप करत भाविकांची सेवा केली. या सेवेमुळे वारकऱ्यांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळाला.
संत तुकाराम महाराजांच्या "क्षुधेलिया अन्न द्यावे, पात्र न विचारून" या अभंगातील संदेशाप्रमाणे भुकेल्याला अन्नदान करणे हाच सर्वोच्च धर्म मानून हा उपक्रम राबविण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी कळंब शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांनी या फराळाचा लाभ घेतला आणि आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे, रामकिसन कोकाटे, माजी तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, नगरसेविका शितल चोंदे, रोहन पारख, प्रशांत लोमटे, पाणीपुरवठा सभापती भूषण करंजकर, भाजप गटनेते हर्षद अंबूरे, शिवसेना गटनेते अतुल कवडे, गुरुलिंग शिंगणापूरे, ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, बंटी चोंदे, अभय गायकवाड, युवराज पिंगळे, सुनील गायकवाड, सुरेश शिंदे, स्वप्नील पिंगळे, पिनू जाधवर, युवराज धाकतोडे, स्वरूप पिंगळे, यश जाधव, सागर शिंदे, सोनू बोराडे, धनंजय दळवी, राजाभाऊ बोराडे, राहुल वाघमारे, किरण बोराडे, अविनाश वाघमारे, बालाजी गपाट, भैय्या बावीकर, विजय पारवे, तात्यासाहेब माने, प्रकाश गिरी, रवींद्र जाधव, भास्कर पिंगळे, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल मुंडे, बालाजी शिंदे, सुरेश इंगळे, दत्ता शेंडगे, भरत पिंगळे, अण्णासाहेब पिंगळे, बालाजी काकडे, अमरसिंह भोरे आदी उपस्थित होते.
*चौकटीमध्ये*
*शिवसेना नेते अजित पिंगळे यांनी सात वर्षांपूर्वी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना फराळासाठी हॉटेलांचा आधार घ्यावा लागत असल्याचे पाहिले. यानंतर वारकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी आणि त्यांना मोफत फराळ मिळावा या उद्देशाने त्यांनी फराळ व फळवाटपाचा सेवाभावी उपक्रम सुरू केला. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे व भक्तिभावाने राबविला जात असून, दरवर्षी हजारो वारकरी या सेवेचा लाभ घेत आहेत. यंदाही सुमारे दहा हजार वारकऱ्यांनी या सेवाकार्याचा लाभ घेतला*.