तुळजापूरात ॲड. आदित्य ढोबळे पाटील यांचा मित्रपरिवाराकडून जाहीर सत्कार
तुळजापूर : विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथून बीबीए एलएलबी (BBA LL.B.) पदवी यशस्वीरीत्या पूर्ण करून तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर ॲड. आदित्य बालाजी ढोबळे पाटील यांचा त्यांच्या वडील बालाजी ढोबळे पाटील यांच्या मित्रपरिवारातर्फे फेटा, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश चोपदार यांनी मनोगत व्यक्त करताना आदित्य ढोबळे पाटील यांनी वकिली व्यवसायात प्रामाणिकपणे कार्य करून न्यायासाठी आणि समाजहितासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना ॲड. आदित्य बालाजी ढोबळे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. "मी माझ्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी करीन. समाजातील गरजू व न्यायापासून वंचित असलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करीन," असा शब्द त्यांनी दिला. तसेच पुढील वाटचालीत सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद व मार्गदर्शन कायम पाठीशी राहावे, अशी नम्र अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या सत्कार समारंभास तुळजापूर येथील नामांकित बिल्डर व रोटरीयन रामभाऊ चोपदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेश चोपदार, गणेश बिल्डर्सचे सहदेव घाडगे, बिल्डर कृष्णा चव्हाण, बिल्डर मिथुन पोफळे, बिल्डर सागर पारडे, जगदंबा रिअल इस्टेटचे प्रदीप गुरव, बालाजी ढोबळे पाटील तसेच अजिंक्य ढोबळे पाटील यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.