ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या अध्यक्षपदी मेहराज महेबूबपाशा पटेल यांची निवड
उस्मानाबाद (धाराशिव) येथे २०२६ च्या जुलूस आयोजनाची जबाबदारी; बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा
उस्मानाबाद (धाराशिव) : ईद-ए-मिलादुन्नबी (पैगंबर जयंती) जुलूस कमिटी २०२६ च्या अध्यक्षपदी मेहराज महेबूबपाशा पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली. शहरातील इस्लाम धर्मीय समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य जुलूस काढण्यात येतो. यंदाच्या जुलूस आयोजनाची जबाबदारीही उत्साहात पार पाडण्यासाठी जुलूस कमिटीची निवड करण्यात आली.
यासंदर्भात दिनांक २४ जुलै २०२६ रोजी समा हॉल येथे बैठक घेण्यात आली. बैठकीची सुरुवात कुराण पठणाने झाली. बैठकीच्या प्रस्तावना व मागील वर्षाचा लेखाजोखा अध्यक्ष सय्यद इर्शाद इस्माईल यांनी मांडला. यावेळी कारी मोहम्मद इस्माईल खान, हाफिज अफजल निजामी, हाफिज असलम, हाफिज अब्दुल हाफिज, हाफिज इर्शाद बरकाती, हाफिज जुनैद कुरेशी, वसीम अतारी, हाफिज बिलाल, हाफिज तौफिक, हाफिज मुजक्कीर यांच्यासह शहरातील धर्मगुरू उपस्थित होते.
बैठकीस शहरातील ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक खलिफा कुरेशी, नादेकल्ला हुसेनी, मुनीर कुरेशी, बाबा मुजावर, शेख मुहीब, कादर खान पठाण, अझहर मुजावर, अझहर पठाण, फरमान काझी, इर्शाद कुरेशी, इरफान कुरेशी, इर्शाद शेख, महेमूद मुजावर, जाकेर शेख, सय्यद मुजम्मील तसेच शहरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आगामी ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी २०२६ साठी उपस्थितांच्या संमतीने मेहराज महेबूबपाशा पटेल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी सय्यद इर्शाद, सय्यद शौएब, निहाल (पप्पू) काझी, असलम मुजावर, ईस्माईल कुरेशी, आरिफ नाईकवाडी, रहमत मुल्ला, अलीम शेख, सय्यद राजू, शफिक साहेब, बाबूल बागवान, सलमान मुल्ला, फोरोज पठाण यांनी परिश्रम घेतले.
नूतन जुलूस कमिटीची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्ष : मेहराज पटेल
उपाध्यक्ष : मोहम्मद कैफ काझी
उपाध्यक्ष : कलीम कुरेशी
सचिव : सय्यद इर्शाद
कार्याध्यक्ष : सय्यद शौएब
कार्याध्यक्ष : सय्यद तज्यब
कोषाध्यक्ष : सय्यद नोमान इस्माई
सदस्य : शेख अलीम
सदस्य : अब्बास नदाफ
सदस्य : सय्यद आबेद
सदस्य : इर्शाद मुजावर
सदस्य : गुड्डू भाई JK
सदस्य : सय्यद शहनवाज
सदस्य : निहाल (पप्पू) काझी
सदस्य : अफसर कुरेशी
सदस्य : मोहतशिम कुरेशी
सदस्य : मदनी कुरेशी
सदस्य : आदिब काझी
बैठकीचे सूत्रसंचालन कारी मोहम्मद इस्माईल खान यांनी केले. नूतन अध्यक्ष मेहराज पटेल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. आगामी ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस शांतता, शिस्त आणि धार्मिक उत्साहात पार पाडण्यासाठी समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.