वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा' — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची पंढरपुरातील व्यवस्थेची पाहणी


'वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा' — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची पंढरपुरातील व्यवस्थेची पाहणी

पंढरपूर | प्रतिनिधी

आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना त्यांच्या सेवेत कोणतीही उणीव राहू नये, प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तथा कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या विविध व्यवस्थांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी वारकरी निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा, वैद्यकीय पथके, आपत्कालीन सुविधा तसेच दर्शन व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. कोणत्याही वारकऱ्याला अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

"आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि संतपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे," अशी भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला अधिक दक्षतेने काम करण्याचे निर्देश दिले.

तर आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनीही वारकऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत, कोणतीही तक्रार येणार नाही यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्यावर भर दिला.

यंदाच्या आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरात दाखल होणार असल्याने शासनाने केलेल्या नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही नेत्यांनी वारकरी सेवेला प्राधान्य दिल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश या पाहणीतून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!